Paranda

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर गुंडाकडून हल्ला गुंडावर कडक कारवाई करण्याची विश्वगामी पत्रकार संघ परंडा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्या कडे मागणी

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर गुंडाकडून हल्ला गुंडावर कडक कारवाई करण्याची विश्वगामी पत्रकार संघ परंडा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्या कडे मागणी

सुरेश बागडे परंडा

परंडा : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष शहाबाज दिवकर यांच्यावर कसारा रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात गुंडांकडून प्राणघातक भ्याड हल्ला झाला याबाबत चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ परंडा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आली आहे

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक ३ सप्टेबर रोजी तहसिलदार परंडा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन परंडा पत्रकार शाखेच्या वतीने देण्यात आले .

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर गाव गुंडानी हल्ला केला या हल्याचा निधेष करून हल्लेखोरावर व गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
तसेच राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यवसायिक वाळू माफिया व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गुंडांकडून हल्ले केले जातात व पत्रकारांना खोट्या गुन्हांमध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो यावेळी पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा.
तसेच यु ट्यूब न्यूज चॅनलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घेण्यात यावे. राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा.
राज्यातील सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे. , राज्यातील शासकीय विश्रामगृहाचा पत्रकारांना निशुक्ल प्रवेश देण्यात यावा
राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभारावे. पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी
प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे. वयोवृध्द पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी.
शासकीय नोकऱ्यामध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तिंना प्राधान्य देण्यात यावे. शैक्षणिक प्रवेशमध्ये पत्रकारांच्या कुटुंबियांना प्राधान्य मिळावे.
अशासकीय समित्या, पोलीस दक्षता समिती, शांतता समिती, आरोग्य समिती, शालेय व्यवस्थापन समिती महामंडळ व शासनाच्या नियंत्रणाखाली असलेले ट्रस्ट यामध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत
निवेदनावर परंडा तालूका अध्यक्ष निसार मुजावर , कार्याध्यक्ष प्रशांत मिश्रा , शहर अध्यक्ष भजनदास गुडे , जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाघमोडे , तालुका उपाध्यक्ष समीर ओव्हाळ सह सचिव आजिनाथ राऊत , सुरेश बागडे , धनंजय गोफणे आशोक माने ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button