Chandwad

चांदवडच्या रस्त्यावरील कुत्र्यांचे थैमान सोशल मीडियावर

चांदवडच्या रस्त्यावरील कुत्र्यांचे थैमान सोशल मीडियावर

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरात दिवसेंदिवस कुत्रे येतात कुठून हा प्रश्न सध्या चांदवड शहरातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.या रस्त्यावर ग्रुप करून थैमान घालणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणेसाठी वारंवार नगरपरिषदेत निवेदन दिलेले होते,काही प्रमाणात कुत्र्यांची संख्या कमी देखील झाली होती मात्र अचानक ही संख्या कशी वाढते हा अनुत्तरित प्रश्न?
चांदवड शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक शेखरभाऊ जाधव यांनी सोशल मीडियावर चक्क रस्त्यात जमलेल्या कुत्र्यांचा फोटो शेयर करत नगरपरिषदने सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.पायी चालणारी लहान मुलेसुद्धा कुत्र्यांना घाबरतात.कॉलनी परिसर व गावातील काही भागात कुत्रे रस्ता अडवून उभे राहतात.यावर उपाययोजना नगरपरिषदने करणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button