Solapur

शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात तंत्रज्ञान साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. प्राचार्य डॉ. कोरडे डायट वेळापूर- सोलापूर यांचे प्रतिपादन

शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात तंत्रज्ञान साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करावा.
प्राचार्य डॉ. कोरडे डायट वेळापूर- सोलापूर यांचे प्रतिपादन

प्रा जयश्री दाभाडे

केंद्र अरण ता. माढा ची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत प्राचार्य डॉ. कोरडे मार्गदर्शन करताना बोलत होते. या शिक्षण परिषदेसाठी श्री. राजकिरण चव्हाण राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन सोलापूर, मारुती फडके, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी, श्री संभाजी रोडे जिल्हा समन्वयक ज्ञानप्रकाश फाउंडेशन पुणे, श्री.महादेव सोनवणे विषय तज्ञ पंचायत समिती कुर्डूवाडी, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे, केंन्द्रांतील प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक या ऑनलाईन शिक्षण परिषदेसाठी उपस्थित होते. अरण केंन्द्रांचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी प्रास्ताविक केले. श्री राजकिरण चव्हाण यांनी ‘शाळा बंद पण शिक्षण चालू,’ ठेवण्यासाठी शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे व्हावा या हेतूने त्यांनी शिक्षकांना विविध शैक्षणिक ॲप ची माहिती व त्याचा अध्यापनासाठी वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये गूगल लेंस ,ॲनिमल फोर डी, काईन मास्टर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल्स तसेच ट्विटर, फेसबुक, ब्लॉग याविषयीही सविस्तर माहिती दिली. तसेच शिक्षकांनी पीपीटी कशा तयार करावी, क्यूआर कोड कसे तयार करावेत. रोजच्या नोंदी कशा ठेवाव्यात व तयार केलेल्या व्हिडिओला क्रोमा इफेक्ट कसा द्यावा याविषयीही अधिक माहिती दिली.
प्राचार्य डॉ. कोरडे यांनी अरण केंद्राच्या प्रगतीबाबत गौरव उद्गार काढले. तसेच मुलांना मूलभूत क्रिया आल्याशिवाय पुढे जाऊ नये, अभ्यासक्रम संपवण्याच्या मागे लागू नये, अध्यापन निष्पत्ती कडे बारकाईने पहावे, गुणांची स्पर्धा न करता त्यांच्या जीवन कौशल्यांचा विकास करावा, पोपटपंची पद्धतीचा वापर न करता त्यांच्यातील अभिव्यक्ती कौशल्य विकसित करावे, विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवावे याबाबत मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण आपल्या अरण केंद्रात प्रभावीपणे सुरू असल्याबद्दल तसेच ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम प्रभावीपणे राबवणाऱ्या कल्पना घाडगे व श्रीमती वंदना खुने यांचे सह शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच विविध प्रशासकीय सूचनां बाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, गुणवत्ता वाढवणे व गुणवत्ता टिकवणे यासाठी किती महत्त्वाचा आहे हे श्री संभाजी रोडे यांनी खूप सविस्तरपणे सांगितले. पंचायत समिती कुर्डूवाडी बीआरसीचे श्री महादेव सोनवणे यांनी कामामध्ये सुसूत्रता यावी व गुणवत्ता विकासासाठी केंद्र स्तरावर वेगवेगळे नऊ गट स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातून शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गट तयार करण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. विलास काळे केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचा ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षणाबाबत आढावा घेतला, प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
ऑनलाईन शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री नवनाथ शिंदे यांनी केले तर आभार श्री गोरख राऊत यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button