Amalner

अपंग युनिटच्या शिक्षकांची मा. औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल

अपंग युनिटच्या शिक्षकांची मा. औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल

अपंग युनिटच्या शिक्षकांना कायमस्वरूपी पदस्थापना व सामान्य शिक्षका प्रमाने वेतनश्रेणी मिळणेबाबतच्या याचिकेत मा.औरंगाबाद हायकोर्टाकडुन केंद्र व राज्य सरकारला नोटिस, अपंग समावेशित शिक्षण योजनेतील करारानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांनी ऍड योगेश पाटिल यांच्यामार्फत मा.औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली असुन सदर याचिकेत 27 ऑगस्ट रोजी प्राथमिक सुनावणी होवुन ,केंद्र व राज्य सरकार च्या शिक्षण विभागातील सचिव व ईतर अधिकाऱ्यांना नोटिस काढुन खुलासा सादर करण्याचे आदेश मा.हायकोर्टाने दिले, अपंग युनिटच्या शिक्षकांना पदस्थापना देतांना,राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासक) समग्र शिक्षा विभाग महाराष्ट्र शासन राजेंद्र पवार यांनी दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार धुळे,जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील प्रवीण शंकर पाटील, विनोद हिंमतराव वाल्हे,दिलखुश नथ्थु सैदाणे ,किशोर मुरलीधर पाटिल, स्नेहल विनायक पाटिल, पंकज दाजिबा पाटिल, लहु शांताराम पवार ,सयाजी जिजाबराव पाटिल, छाया मेघराज देसले, संगिता शालिग्राम पाटिल, संगिता फकिरा वाघ ,मच्छिंद्र उत्तम पाटिल, विशाल विठ्ठल पाटिल, भुषण सुरेश सैदाणे,प्रशांत विजय बच्छाव, शांताराम राघो बच्छाव, चुनिलाल बाजीराव पाटिल व भानुदास नाना पाटिल यांना नियुक्त्या दिल्या, सदर नियुक्तीपत्र देतांना करारानुसार व मानधनानुसार विशेष शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतर सदर शिक्षकांनी advocate योगेश पाटिल यांच्यामार्फत याचिका दाखल केली ,सदर नियुक्तीपत्र नियमबाह्य असल्याने सदर शिक्षकांच्या नियुक्त्या या 31 ऑगस्ट 2009 रोजीच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार होणे अपेक्षित होत्या असा महत्त्वपूर्ण ,प्रभावी व मुद्देनिहाय युक्तिवाद advocate योगेश पाटिल यांनी केला , सदर युक्तिवाद ऐकल्यानंतर मा.औरंगाबाद हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारचे शिक्षण विभागातील सचिव, समग्र शिक्षा विभागाचे सहसंचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांना नोटिसा काढुन 29 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेत, याचिकाकर्ते यांच्यामार्फत advocate योगेश पाटिल यांनी युक्तिवाद केला त्यांना ऍड अर्चना पवार यांनी सहकार्य केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button