Faijpur

शिक्षक दिनी म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे नारीशक्ती तर्फे शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनी म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे नारीशक्ती तर्फे शिक्षकांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

शिक्षक हे फक्त विद्यार्थी घडवत नाहीत तर आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे महत्वाचे कार्य करत असतात.असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व भाजपा ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सहसंपर्कप्रमुख दिपाली चौधरी झोपे यांनी केले आहे.त्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथे बोलत होत्या.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात साजरा होत असलेल्या शिक्षक दिनानिमित्त रविवारी ५ सप्टेंबर रोजी फैजपूर येथील ऐतिहासिक म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे श्रीमती दिपाली चौधरी झोपे प्रदेश सहसंपर्कप्रमुख भाजपा ओबीसी महिला मोर्चा महाराष्ट्र यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून तसेच मुख्याध्यापक श्री.संजय सराफ सर यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करुन सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे फैजपूर चे मुख्याध्यापक श्री.संजय सराफ सर,श्री.आर एल आगळे सर,पर्यवेक्षक सि.एल धांडे सर,सांस्कृतिक प्रमुख बी.डी महाले सर, एन पी पाटील सर,ज्येष्ठ शिक्षक एम के महाजन सर,ए एस नेहेते सर,आर एन तडवी सर,व्ही एम भोई सर, कल्पना तायडे मॅडम,अनिता बी राजपूत मॅडम,राजश्री महाजन मॅडम,हसीना तडवी मॅडम,निलिमा खडके मॅडम यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने श्री.बी.डी.महाले सर लिखित ‘सातपुड्यातील आदिवासी भिल्ल’ हे पुस्तक नारीशक्ती गृप अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांना भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button