Rawer

समाजाची दिशाभूल करणार्याला धडा शिकवा..जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे

समाजाची दिशाभूल करणार्याला धडा शिकवा…. जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे

संदिप कोळी रावेर

दि. 18/1/22 रोजी सावदा शासकीय विश्राम गृह येथे आदिवासी कोळी महासंघाची बैठक जेष्ठ मार्गदर्शक सोपान सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्या वेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे यांनी समाजावर होणारा अन्याय दिवसं दिवस वाढतच आहे, दिशाभूल करणारे आपले स्वाथी काही लोक आहेत .तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे व जनजागृती करुन समाजाची दिशाभूल करणार्याला धडा शिकवला पाहिजे.तसेच गंभीर दादा यांनी समाजातील लोक जो पर्यंत तरुण पिढी समोर येत नाही तोपर्यंत समाज जनजागृती होणार नाही. आम्ही जेष्ठ, श्रेष्ठ फक्त मार्गदर्शक करु शकतो, खरी लढा फक्त तरुणच देऊ शकतो. संदिपभैय्या सोनवणे यांनी समाज कारण करित असतांना आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे तसेच कोणत्याही पक्षाचे काम करा पण समाज म्हणून पक्षाचे जोडे बाहेर काढून एकत्र या तसेच सामाजिक हित जोपासताना शैक्षणिक दृष्ट्या व आर्थिक सुध्दा आपण भक्कम असणे गरजेचे आहे.चर्चेवेळी विश्वनाथ कोळी यांनी रावेर तालुक्याला सभापती पद मिळवून दिल्या बद्दल त्यावेळी त्यांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून केलेला ठराव आजपर्यंत पारित झाला नाही. काही लोक समाज कारणापेक्षा राजकारणाला व पक्षाला महत्त्व देतात. तसेच समाजाच्या नावावर स्वतः ची पोटगी भरतात अशा लोकांना समाजाने विरोध व नाकारले पाहिजे.
त्यावेळी आदिवासी कोळी महासंघाच्या युवक ता. अध्यक्ष पदी आंदलवाडी येथील ग्रा.प.सदस्य दिलीप कोळी व आदिवासी कोळी समाजाच्या तालुका अध्यक्ष पदी नारायण तायडे व उपाध्यक्ष नितीन कोळी तासखेडा,कार्याध्यक्ष गफ्फूर कोळी,ता.संघटक प्रविण कोळी रायपूर,सचिव सुजित कोळी आदंलवाडी, सहसचिव अनिल जैतकर,ता.चिटणीस योगेश कोळी गाते, ता. सहचिटणीस उमेश तायडे गहुखेडा,ता.सदस्य फकिरा कोळी मांगी, ता. सदस्य मोहन कोळी कोळदा, ता. सदस्य तुषार सपकाळे मस्कावद बु, ता. सदस्य प्रविण कोळी आदंलवाडी,ता.सदस्य मोहन कोळी अटवाडा अशी तालुका कार्यकारिणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. त्यावेळी जिल्हा सल्लागार चंद्रकांत कोळी, जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी, जिल्हा सदस्य विनोद कोळी, तालुका अध्यक्ष मनोहर कोळी,ता.उपाध्यक्ष रवींद्र सपकाळे युवा अध्यक्ष चंद्र कांत कोळी,युवा उपाध्यक्ष राहुल कोळी,ता.सदस्य जंगलू बाविस्कर,ता.सरचिटणीस सुपडु मोरे,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर, यावल युवा अध्यक्ष खेमचंद कोळी, किरण कोळी, राहुल कोळी, पृथ्वी जैतकर, उमेश कोळी, दिपक कोळी, संदेश सोनवणे,देवानंद कोळी, विनोद कोळी, अजय कोळी, संजय कोळी,मुकुंदा कोळी आदी उपस्थित होते सुत्रसंचालन नारायण तायडे व ईश्वर कोळी यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button