Bollywood

तारक मेहता फेम..नट्टू काकांचे निधन.!

तारक मेहता फेम..नट्टू काकांचे निधन.!

मुंबई छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधे नट्टू काकाची भुमिका करणारे अभिनेते घनशाम नायक यांचे कॅन्सरने निधन झाले आहे. मृत्युसमयी ते 78 वर्षाचे होते. गेले कित्येक दिवसांपासून ते कॅन्सरसोबत झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात घनश्याम यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे. तारक मेहता का उल्टा चष्माची अख्खी टीम शोकाकुल आहे.

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी घनशाम नायक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. घनशाम नायक हे नट्टु काका या नावानेच प्रेक्षकांमधे प्रसिद्ध होते. या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नसरुद्दीन शहा यांच्या मासुम या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भुमिका केली होती.

ही होती शेवटची इच्छा
काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे असं ते भावूक होऊन म्हणाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button