Betawad

तापी माईच वस्त्रहरण सुरूच प्रशासनाचे दुर्लक्ष तक्रारी करूनही वाळू माफियांना पाठिंबा

तापी माईच वस्त्रहरण सुरूच… प्रशासनाचे दुर्लक्ष तक्रारी करूनही वाळू माफियांना पाठिंबा

बेटावद अमोल बैसाने

जळगांव आणि धुळे जिल्ह्यातील तापी आणि इतर नद्या ह्या जीवन संजीवनी आहेत या नद्यांमधून अव्याहत पणे वाळू चोरी ,उपसा सातत्याने सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातील वाळूच शिल्लक राहिली नसून झाडे झुडपे उगण्यास सुरुवात झाली आहे.

तापी माईच वस्त्रहरण सुरूच प्रशासनाचे दुर्लक्ष तक्रारी करूनही वाळू माफियांना पाठिंबा

असाच प्रकार ठिक ठिकाणी होत असताना मुंडावद मळसर यां गावातून तापी नदी पात्र तून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू आहे. या संदर्भात बेटावद मंडळातील नागरिक,सामाजिक संघटना यांनी सर्कल श्री.नेरकर यांना वारवार तक्रारी वा फोन करून देखील तक्रारी केल्या आहेत तरी देखील सदर प्रशासकीय कर्मचारी कार्यवाही साठी येत नाही. भर दिवसा वाळू वाहतूक करणारे ट्रकटर हे मळसर पाश्टे मार्गे वारूळ हायवेवरून जातात तरी देखील महसुल प्रशासन तहसिलदार व पोलीस प्रशासन यांचे वाळू माफियांशी काही साठे लोटे आहे का अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

Leave a Reply

Back to top button