World

सत्तेत येताच तालिबान चा भारताला धक्का..! आयात निर्यात रोखली…!

सत्तेत येताच तालिबान चा भारताला धक्का..!आयात निर्यात रोखली…!

काबुल काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे (FIEO) महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे देशातून होणारी आयात रोखण्यात आली आहे.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे सर्व निर्यात होत होती. सध्याच्या घडीला तालिबानने पाकिस्तानला जाणारी कार्गो वाहतूक रोखली आहे. यामुळे आपोआप आयातही रोखली गेली आहे. भारताचे अफगाणिस्तानसोबत व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत फार जुने संबंध आहेत.

आम्ही अफगाणिस्तानच्या सर्वोत मोठ्या भागीदारांपैकी एक आहोत. २०२१ मध्ये आम्ही कोट्यवधींची आयात आणि निर्यात केली आहे. फक्त व्यापारच नाही तर अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली होती.आम्ही तीन बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून अफगाणिस्तानात जवळपास ४०० प्रकल्प सुरु आहेत.

काही गोष्टी आंततरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण मार्गे निर्यात होत असून त्या सुरळीत आहेत. दुबईमार्गे होणारी आयातही सध्या सुरळीत आहे. निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषधं, मसाले यांची समावेश असून आयातीमध्ये जास्त करुन ड्राय फ्रूट्सचा समावेश आहे.

संबंधित लेख

Back to top button