Ahamdanagar

सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षाचे (होईक)भविष्य; सहा महिन्यात कोरोणा जाणार ?

सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षाचे (होईक)भविष्य; सहा महिन्यात कोरोणा जाणार ?

सुनिल नजन

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील विरभद्र(बिरोबा) देवाच्या यात्रेत बिरोबा भक्त सिताराम बाळाजी भगत यांनी नंग्या तलवारीचे ३६ वार उघड्या अंगावर घेत पारंपारिक भाषेत (होईक)आगामी वर्षाचे भविष्य सांगितले. अंगावर तलवारीचे वार घेऊनही कोणत्याही प्रकारची ईजा झाली नाही हे देवाचे सत्व आहे.भविष्य पुढील प्रमाणे दिवाळीला पाउस येईल, पिडा होईल काही हसतील काही रडतील,चंपाषष्ठीला पाउस येईल, पांढऱ्याच सोन होईल म्हणजे कापुस जास्त भावाने विकेल.बांगडी फुटन म्हणजे महिलावरील अत्याचारात वाढ होईल.गहु हरबरे बरोबरीने पिकतील पण सव्वापटीने महाग विकतील.वादळ होईल आई आणि मुलाची ताटातूट होईल, रक्ताचा पुर वाहील, घात -अपघात होउन जमिनीवर रक्त सांडेल.उन्हाळ्यात बैलांना पिण्यासाठी लवकर पाणी मिळनार नाही. पण बैलांच्या किमती सोन्या पेक्षाही जास्त महाग होतील. ढगफुटी होईल, जठुड साधन म्हणजे बाजरी,मुग,मठ,तूर,भुईमूग ही पिके येतील पण पुढील वर्षी आषाढ महिन्यात पाउस पडनार नाही, अतिरेकी कारवाया वाढतील, आणि शेवटी कोरोणा रोगाची महामारी सहा महिन्या नंतर म्हणजे एप्रिल महिन्यानंतर कमी होईल अशी भविष्य वाणी मीरीच्या विरभद्रबिरोबा मंदिरात वर्तविण्यात आली आहे. यात्रेनिमित्त गंगाजलाने बिरोबा देवाचा जलाभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. छबिन्यात पालखी मिरवणूक, शोभेच्या दारूची आतषबाजी,मंदिरा समोर विविध कलाकारांची हजेरी कार्यक्रम, दुपारी १ वाजता डफाच्या वाद्यांच्या गजरात होईक होउन शिर्डीचे बिरोबा भक्त रतीलाल लोढा काका यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा महोत्सव सोहळ्यासाठी आसाराम भगत,अशोक गवळी, अशोक घोंगडे, राजुमामा तागड,जबाजी निर्मळ, नामदेव सोलाट, राहुल गवळी,मनोज लोढा, अशोक सोलाट सर,बाबासाहेब वीर,पोपट गवळी, राजुभाई शेख,अंन्सारभाई शेख,संभाजी सोलाट, सागर वीर,साहेबराव गवळी,मयूर तागड संदिप वीर,बाबासाहेब निर्मळ यांनी विषेश परिश्रम घेतले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button