Pandharpur

सामाजिक कार्याची दखल घेऊन माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष कांबळे यांची एकमताने निवड

सामाजिक कार्याची दखल घेऊन माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष कांबळे यांची एकमताने निवड

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर अध्यात्मिक गुरु श्री संत रोहिदास महाराज यांच्या 644 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे संताबाई मठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री संत रोहिदास महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री बबनरावजी घोलप यांच्या आदेशाने पंढरपूर तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे म्हणाले संघटनेची स्थापना करताना संस्थापक बबनराव घोलप साहेब यांनी चर्मकार समाजावर होणारा अन्याय व अत्याचार दूर व्हावा तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या हेतूने संघटनात्मक चळवळ उभी केली आहे. चर्मकार समाजातील कोणत्याही कुटुंबावर किंवा व्यक्तीवर अन्याय अत्याचार झाल्यास संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.तसेच प्रदेश युवक अध्यक्ष नितीनजी शेरखाने यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले समाजाने खेकड्याची चाल बंद करून प्रत्येकाला अडीअडचणीत मदत करा तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून घ्या वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभे करा चर्मोद्योग महामंडळाकडून चर्मकार समाजाला मिळणाऱ्या योजना यामध्ये गटई कामगारांना मिळणारा स्टॉल चपला बनवण्यासाठी मिळणाऱ्या मशनरी तसेच लघुउद्योग यांचा लाभ घ्यावा गरज पडल्यास आमच्याशी संपर्क साधावा असेही यावेळी सांगण्यात आले.
पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे या. खर्डी यांनी बोलताना सांगितले संघटनेच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच समाजाच्या महिला भगिनींनी व समाज बांधवांनी कोणत्याही प्रकारच्या अडचणीच्या वेळेस कधीही फोन करावा मो.9890266143
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मार्गदर्शक अशोक लामतुरे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे तसेच प्रदेश युवक अध्यक्ष नितीनजी शेरखाने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश तूपसमुद्रे जिल्हाध्यक्ष दत्ता नाना बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी खालीलप्रमाणे फादरबॉडी-
पंढरपूर तालुकाध्यक्ष – संतोष प्रभाकर कांबळे
कार्याध्यक्ष – कुंडलीक गवळी
उपाध्‍यक्ष – बाळु क्षीरसागर
उपाध्यक्ष – पंकज बनसोडे
सचिव – विजयकुमार गवळी
फादर:- शहराध्यक्ष – नवनाथ कांबळे उपाध्यक्ष – अजय वाघमारे कार्याध्यक्ष – यल्लाप्पा कबाडे युवक शहर:- शहराध्यक्ष – सुनील आगावणे उपाध्यक्ष – शुभम वाघमारे तालुका कार्यकारणी:- युवक पंढरपूर तालुका:- तालुकाध्यक्ष – योगेश कांबळे उपाध्यक्ष – तानाजी शिरसागर
कार्याध्यक्ष गणेश व्हनकळस
पंढरपूर तालुक्याच्या कार्यकारिणी बरोबरच जिल्हा कार्यकारिणीच्या ही निवडी जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले.जिल्हा पदाधिकारी पुढील प्रमाणे जिल्हा समन्वयक – सुनील गवळी जिल्हा युवक अध्यक्ष – शैलेश आगावणे जिल्हा संघटक – सचिन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष – दगडू माने जिल्हा उपाध्यक्ष समाधान व्हनकळस जिल्हा कार्याध्यक्ष – तानाजी कांबळे जिल्हा युवक कार्याध्यक्ष – सचिन वाघमारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख- जोतिराम कांबळे
कायदेशीर सल्लागार – अँड. तुषार खडतरे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व
आदी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button