Mumbai

घ्या भो..!आता पुन्हा गोंधळ आणि परीक्षेत मुजरा..!एकाच दिवशी हे दोन पेपर..!पहा काय आहे प्रकार..!

घ्या भो..!आता पुन्हा गोंधळ आणि परीक्षेत मुजरा..!एकाच दिवशी हे दोन पेपर..!

मुंबई नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी परीक्षा ही विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली.अगदी आदल्या रात्री ही परीक्षा रद्द करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि टीकेला सरकारला सामोरे जावे लागले.

त्यानंतर आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.पण आता यातही गोंधळ झाला आहे.कारण गट ड ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.आता विषय असा आहे की अनेक पदवीधर विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची?असा घोळ निर्माण झाला आहे. बिचारे विद्यार्थी गोंधळात असून आधीच कोरोना मुळे नोकऱ्या उद्योग,व्यापार,शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत. रोजगार नाही त्यामुळे कुठेतरी इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांना आता नोकरी साठी अर्ज करता येत आहेत आणि त्यातही शासनाचा प्रचंड गोंधळ उडतो आहे.

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी परीक्षेची तारीख ठरविताना ३१ ऑक्टोबर रोजी इतर कोणतीही परीक्षा आहे का की नाही चौकशी करणे आवश्यक होते.हे म्हणजे असे झाले की आंधळं दळंत आणि कुत्रं पीठ खात..!एकमेकांचा पायपोस एकमेकांच्या पायात नाही असाच याचा अर्थ निघत आहे.३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्य शासनाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. नशीब हे थोडं लवकर लक्षात आले की जेणेकरून ह्या संदर्भात पुनर्विचार होऊ शकेल आणि कदाचित पुन्हा कोणत्या तरी एका परीक्षेच्या तारखा बदलवल्या जाऊ शकतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button