India

आरोग्याचा मुलमंत्र हिवाळ्यात घ्या टाचांची काळजी

आरोग्याचा मुलमंत्र..हिवाळ्यात घ्या टाचांची काळजी

आपले सौंदर्य व आरोग्य जपण्यासाठी नेहमीचं महागड्या ट्रेंटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्सची गरज नसते. तर साधे घरगुती उपाय देखील फार फायदेशीर ठरतात. घरातील कितीतरी पदार्थ फार उपयुक्त असतात. फक्त त्यांचे फायदे आणि ते कसे वापरायचे हे ठाऊक असणे आवश्यक आहे.

पायाला भेगा पडण्याची कारणे

– अनवणी चालणे
– अधिक वेळ उभे राहणे
– पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयी मुळे
– डायबेटीस मुळे
– हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्या मुळे
– व्हिटॅमिन्स च्या कमतरते मुळे

• उपाय :-

१. कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

२. लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.

३. बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.

४. चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.

५. हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

६. बदाम आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये शुष्क त्वचा मुलायम करण्यासाठी आवस्यक असणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या तेलांचा वापर करून मालिश करा आणि त्यानंतर पायांमध्ये सॉक्स घाला. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथिक तज्ञ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button