Aurangabad

अर्थचक्र सुरू होत असले तरी जीवनचक्र बिघडू नये याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

अर्थचक्र सुरू होत असले तरी जीवनचक्र बिघडू नये याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये. यासाठी जिल्हातील औरंगाबाद, वाळूज, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पैठण,करमाड, बिडकीन इ. ठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येत आहेत.

या अनुषंगाने सर्व SDO व नोडल अधिकारी यांची आज बैठक घेण्यात आली. संबंधित ठिकाणी PSA प्लान्ट उभारणीसाठी आवश्यक असलेले शेड उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button