Maharashtra

10 वी 12 वी च्या परीक्षा ऑनलाइन घ्या विद्यार्थ्यांचे राज्यात आंदोलन..! हिंदुस्थानी भाऊ उतरला विद्यार्थ्यांच्या बाजूने आंदोलनात…!विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज

10 वी 12 वी च्या परीक्षा ऑनलाइन घ्या विद्यार्थ्यांचे राज्यात आंदोलन..! हिंदुस्थानी भाऊ उतरला विद्यार्थ्यांच्या बाजूने आंदोलनात…!

मुंबई राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन (SSC HSC Exam 2022) पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या (10th 12th online exam) मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तर दुसरीकडे नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जमून निदर्शने केली आणि दहावी, बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली.

ऑफलाइन परिक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी धारावी येथे वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली होती. यंदा ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही देण्यात येणार आहे. मात्र ३१ जानेवारी रोजी राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी निदर्शने केली.

औरंगाबाद सह नागपूर,नाशिक इ ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निदर्शने केली. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे, त्यामुळे अभ्यासाचा हवा तसा सराव झालेला नाहीये. ऑनलाइन क्लास करताना तांत्रिक अडचणींना सामना करावा लागल्याने त्याचा परिणाम अभ्यासावर झाला आहे. तसेच अभ्यासाचा लिखाणाचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे एक महिन्याच्या वेळ अभ्यासासाठी देत,मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात; तसेच ‘इंटर्नल’ आणि ‘एक्सटर्नल’ यांच्या गुणांचे प्रमाण सारखे असावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी शनिवारवाड्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात पालकदेखील सहभागी झाले होते. त्यामुळे झालेल्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांना दिले. संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने असल्याने, संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्य मंडळाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता, त्या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा घेताना राज्य मंडळाने इंटर्नल आणि एक्स्टर्नल यांत गुणांचे प्रमाण सारखे असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी हातात फलक घेत घोषणा दिल्या. या वेळी आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक सहभागी झाले होते. आंदोलनाची वाढणारी तीव्रता लक्षात घेऊन, पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोनल गुंडाळले.

तीस टक्के शुल्कमाफी

करोनामुळे विद्यार्थी शाळेत किंवा ज्युनिअर कॉलेजांमध्ये गेले नसतानाही, त्यांच्याकडून संपूर्ण शुल्क घेण्यात येत आहे. या परिस्थितीत ३० टक्के शुल्क माफ करावे. एका विषयाच्या पेपरनंतर पाच ते सहा दिवसांच्या सुट्ट्या द्याव्यात, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.

तर मुंबई मध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थाना समोर निदर्शने करण्यात आली. यात सोशल मिडिया स्टार व बिग बॉस मराठीचे स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आंदोलनात भाग घेतला.या आंदोलनाला थोडा गालबोट लागला असून विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केल्याच्या घटना घडल्या आहेत..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button