Yawal

हंबड्री येथे आदीवासी समाज बांधवांसाठीच्या आयोजीत तडवी प्रिमियर लिगच्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धची सुरुवात

हंबड्री येथे आदीवासी समाज बांधवांसाठीच्या आयोजीत तडवी प्रिमियर लिगच्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धची सुरुवात

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी

तालुक्यातील हंबडी येथे तडवी प्रिमियर लिगच्या तालुका पातळीवरील खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे आज यावल येथील सामाजीक कार्यकर्ते डॉ कुंदन फेगडे तथा रागीनी फाउंडेशन सावखेडा सिम तालुका यावलचे अध्यक्ष तथा आदीवासी चळवळीतील युवा कार्यकर्त सलीम तडवी सर यांच्या हस्ते करण्यात आले . हंबड्री गावातील बसस्थानकाजवळील फैजपुर रोडावरील मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या या आदीवासी समाज बांधवांसाठीच्या आयोजीत या तड़वी प्रीमियर लिग खुल्या मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धत तालुक्यातील तथा परिसरातील एकुण २५ आदीवासी समाजातील तरूणांच्या संघानी यात आपला सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धत प्रथम विजेता संघाला डॉ . कुंदन फेगडे यांच्या वतीने २१,००० एकविस हजार रुपयांचे बक्षीस व स्मृती चिन्ह तसेच या स्पर्धतील अंतीम लढततिल उप विजेता संघास आदीवासी सामाजीक कार्यकर्त सलीम तडवी सर यांच्या वतीने ११, ००० अकरा हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले सलीम तड़वी सर यांनी यावेळी युवा तरुण खेळाडुंना मार्गदर्शन करतांना म्हणाले आपल्या देशात ग्रामीण पातळीवरून क्रिकेट खेळुन अनेक क्रिकेटपटुंनी आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व केले असुन , खेळांमुळे माणसाचा बौद्धीक व शारीरिक विकास होत असते तरी तरूणांनी ईतर व्यसनाकडे न वळता विविध खेळांच्या माध्यमातुन त्यांनी आपले कौशल्यगुण दाखवावे असे आवाहन सलीम सर यांनी या वेळी केले . यावेळी स्पर्धचे आयोजकांनी सलमान इतबार तड़वी भुसावल , शोएब शब्बीर तड़वी भुसावल, मुराद तड़वी मालोद, अजित तड़वी यावल, अशरफ सर सांगवी, परवेज तड़वी यावल, अमित तड़वी यावल, ग्रामसेवक राजू तड़वी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहीलेत . हंबड्री येथील तड़वी टाइगर ग्रुप हंबडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त तसेच आदीवासी समाज बांधव हे या प्रसंगी मोठया संख्येत उपास्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button