sawada

तडवी भिल लाईफ लाईन अंम्बुलंन्स एक जीवनदायीनी सपोनि देविदास इंगोले तडवी भिल समाज दुसरी लाईफ लाईन अंम्बुलंन्स साठी १३ हजारांची देणगी देत सावदा पोलिस स्टेशन स्टाफचां मदतीचा हात सावदा पोलिसांची मानवी रक्षा सह जीवनरक्षासेवा

तडवी भिल लाईफ लाईन अंम्बुलंन्स एक जीवनदायीनी सपोनि देविदास इंगोले
तडवी भिल समाज दुसरी लाईफ लाईन अंम्बुलंन्स साठी १३ हजारांची देणगी देत सावदा पोलिस स्टेशन स्टाफचां मदतीचा हात सावदा पोलिसांची मानवी रक्षा सह जीवनरक्षासेवा
मुबारक तडवी सावदा
सावदा : जळगांव जिल्ह्यातील तडवी भिल समाजाच्या समाजसेवक नौकरदार ग्रुप चे माध्यमातून रुग्णांना उपचारार्थ ने आण करण्याकरिता समाजसेवक नौकरदार लोकसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाहनात्मक शक्कल लढवित समाज बांधवांनकडून दहा रुपयांपासून ते लाखांपर्यंत वर्गणीदारांनी देणगीदार , दात्याकडून १८ लाख रुपये गोळा केले व एक सर्व ऑक्सिजन’ सह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेली तडवी भिल समाज लाईफ लाईन अंम्बुलंन्स घेतली व तब्बल दिडवर्षापासून ती रुग्णवाहिका तडवी भिल समाजासह इतर समाजबांधवांनाही माफक दरात सेवा पुरवित आहे आणि या महामारीच्या काळात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ , रुग्णसेवेचा व्याप वाढल्याने लाईफ लाईन अंम्बुलंन्स संचालक मंडळाने आणखी एक रुग्णवाहिका घेण्याचे ठरविले आणि दानशूर देणगीदार यांना आवाहन केले व समाजातील नौकरदार वर्ग मदतीला सरसावत आहे याचं स्तुत्य उपक्रमात पोलिस बांधवसुध्दा निस्वार्थ हेतूने व समाज सेवक सेवेच्या उदात्त हेतूने सहभाग घेत आहेत सर्व प्रथम पहिल्या रुग्णवाहिकेस सावदा तालुका रावेर जिल्हा जळगांव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल सुरेश अढायंगे यांनी तडवी भिल समाज लाईफ लाईन अंम्बुलंन्स ला २५००/- दोनहजार पाचशे रुपये देणगी देऊन आदर्श निर्माण केला होता याचं स्तुत्य उपक्रमात आदिवासी ची जिवन शैलीची जाण असलेले आदिवासी भागात कर्तव्य बजावलेले आदिवासी समाजाविषयी अपार तळमळ हित जोपासणारे सावदा पोलिस.ता.रावेर.जि.जळगांव येथील पोलिस स्थानक सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री देविदास इंगोले साहेब यांनी स्वता ५०००/- पाच हजार रुपये पोलिस व खुद्द आदिवासी आदिम समाजाचे उपनिरीक्षक श्री राजेन्द्र पवार साहेब यांनी ३०००/- तीन हजार रुपये
सावदा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आदिवासी तडवी समाज पोलिस कर्मचारी अंबुलन्स करिता
1) सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. देविदास इंगोले – 05,000/-
2) पोलिस उप निरीक्षक श्री. राजेंद्र पवार -03,000/-
3) पोलिस हवालदार युसूफ अमीर तडवी (मालोद)- 1000/-
4) पोलिस हवालदार रुस्तम सिकंदर तडवी (लासूर)-1000/-
5) पोलिस हवालदार ममता रहेमान तडवी (फैजपूर) 1000/-
6) पोलिस नाईक सलिम दिलदारखा तडवी (मोहरद) 1000/-
7) पोलिस नाईक मेहेरबान बशीर तडवी (अडावद) 1000/- अशी एकूण देणगी 13,000/- रुपये रोख तडवी भिल समाज लाईफ लाईन अंम्बुलंन्स प्रतिनिधी अमित तडवी फैजपूर यांना देण्यात आली सावदा पोलिस स्टेशन तर्फे सपोनि,पिएसआय,व पोलिस स्टेशन चे समाजाचे निस्वार्थ सैनिकांचे तडवी भिल समाज लाईफ लाईन अंम्बुलंन्स संचालक मंडळाने व तडवी समाजाने आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button