World

T20 Live.. भारतीय संघात ह्या खेळाडूचा प्रवेश..रविवारच्या सामन्यात महत्वाची भूमिका..

T20 Live.. भारतीय संघात ह्या खेळाडूचा प्रवेश..रविवारच्या सामन्यात महत्वाची भूमिका..

दुबई टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. आता रविवारी भारताचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध होईल. हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक असून सर्व प्रकारच्या सकारात्मक बदल केले जात आहेत.
पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकला नव्हता मात्र आता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट असून त्यानं गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी हार्दिकच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करताना दिसू शकेल. हार्दिक गोलंदाजी करत नसल्यानं भारताला एका गोलंदाजाची कमतरता जाणवत आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती त्यामुळे तो खेळू शकत नव्हता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button