Pandharpur

पंढरीत राष्ट्रवादी किसान महिलाचाही मदतीसाठी पुढाकार

पंढरीत राष्ट्रवादी किसान महिलाचाही मदतीसाठी पुढाकार
जिल्हाध्यक्षा शुभांगी जाधव यांनी 35 कुटुंबाना केले विविध वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

लढा कोरोना शी मदत जाधव परिवाराची याकरिता आ. भारत भालके यांच्या सहमतीने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस किसान सभेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सौ.शुभांगी जाधव यांनी पंढरपुरातील निराधार देवदासी,जोग जोगती अशा 35 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप केले.
सदरच्या जीवनावश्यका वास्तूचे वाटप हे जाधव परीवार व संस्कार मित्रमंडळी च्या माध्यमातून करण्यात आले..त्यावेळी कुमार जाधव,दिगंबर झांबरे,संजय पालकर,विनायक वणारे,वैभव जोशी,संस्कार जाधव,हिम्मत कोळेकर,रंजना जाधव उपस्थित होते.आज सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी महिला किसान सभेच्या जिल्हाध्यक्षा सौ शुभांगी जाधव यांच्या मार्फत वाटप करण्यात आलेल्या शिधावाटप या कार्यक्रमातून आला.
त्यांनी बऱ्याच तृतीयपंथी, देवदासी महिला आणि जोगती यांना साधारण आठ दिवस पुरेल एवढे शिधावाटप सढळ हाताने केले. त्यावेळी त्यांच्या हातून केलेल्या अन्नदानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ झळकत होता.आपण केलेली मदत ही खरच गरज असलेल्या गोरगरीबाला पोहोच व्हावी. आताच्या परिस्थितीत कुणीही अन्नावाचुन उपाशी राहू नये एवढीच आशा आहे.यावेळी जिल्हा अध्यक्षा शुभांगी जाधव यांनी सांगितले कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचेआमचे सर्व नेते यांनी गरजू लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यामुळे हे एक मानवतावादि कार्य आणि सेवाच समजुन मी हा उपक्रम राबविली असल्याचे सांगत यापुढेही हे चांगले आणि पवित्र काम मी करीत राहणार असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button