World

T20 Live… सामना गमावला पण…! आणि ह्या आहेत 5 चुका ज्या टीम इंडियाला नडल्या..!

T20 Live… सामना गमावला पण…! आणि ह्या आहेत 5 चुका ज्या टीम इंडियाला नडल्या..!

दुबई टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला जोरदार धक्का देत वर्ल्ड कप च्या इतिहासात प्रथमच भारताविरुद्ध सामना जिंकत इतिहास रचला आहे.कालच्या जवळपास एक तर्फी झालेल्या ह्या सामन्यात भारताने 152 रनचे आव्हान पाकिस्तानने सहज रित्या 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. एक सुंदर खेळ खेळत बाबर आझमने 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी भारतीय खेळाडूंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.सामना संपल्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझवानची गळा भेट घेतली.
टीम इंडियाचा पुढचा सामना रविवार 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होईल. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या टीम आहेत. ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील.

या सामन्यात टीम इंडियाच्या खालील चुकाच महागात पडल्या आहेत..

गोलंदाज पुर्ण पणे फेल..

टी-20 क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात मोठा पराभव मानला जात आहे.कारण एकही विकेट न गमावता पाकिस्तान ने विजय मिळवला आहे.आता पर्यंत कधीही भारताचा 10 विकेटने पराभव झाला नव्हता. त्याचप्रमाणे पाकिस्तानही टी-20 क्रिकेटमधला हा पहिल्यांदाच 10 विकेटने विजय मिळाला आहे.याचाच अर्थ भारतीय गोलं दाजी पूर्ण पणे फेल ठरली आहे.गोलं दाजांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एकही विकेट न घेणे हे तस दुर्मिळच आहे.यातून पाकिस्तानी फलंदाजी किती सक्षम आहे याचाही प्रत्यय आला आहे.

पाकिस्तानी गोलंदाजी स्ट्रॉंग..स्विंग बॉलिंग चा त्रास

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून आधी गोलं दाजी निवडली. यानंतर शाहिन आफ्रिदीने उत्कृष्ट बॉल टाकत सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले. रोहित शर्मा पहिल्याच बॉलला शून्यवर आऊट झाला, तर केएल राहुलही लागोपाठ आऊट झाला. आयसीसी स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा स्विंग बॉलिंगने भारताला त्रास दिला आहे. याआधी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप फायनल आणि जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही स्विंग बॉलिंगसमोर टीम इंडियाची फलं दाजी निष्क्रिय ठरली होती.

अनफिट हार्दिक
हार्दिक पांड्या फिट आणि फॉर्ममध्ये नसूनही विराट कोहलीने त्याला टीममध्ये घेतले. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही हार्दिकला बॅटिंगमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही तो फिल्डिंगसाठीही मैदानात उतरला नाही. बॅटिंग करत असताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो स्कॅनिंगसाठी गेला होता.

अश्विन बाहेर
आर अश्विन हा उत्तम गोलंदाज आहे.2016 टी-20 वर्ल्ड कपनंतर आर.अश्विनला पण पहिल्या सामन्यात खेळू देण्यात आले नाही.टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये अश्विनने उत्कृष्ट बॉलिंग केली पण त्याला या सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. याआधी इंग्लंड दौऱ्यात झालेल्या चार टेस्ट मॅचमध्येही अश्विन बेंचवरच बसून होता. विराट कोहलीच्या टीम निवडीवरही बरीच टीका झाली होती.

अनफिट भुवनेश्वरला संधी

हार्दिक पांड्याप्रमाणेच भुवनेश्वर कुमारही आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करू शकलेला नाही. तरीही त्याला कालच्या सामन्यात खेळवण्यात आलं. याउलट शार्दुल ठाकूरला मात्र बाहेर ठेवण्यात आले. शार्दूलने आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी कामगिरी केली होती. यानंतर टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये राखीव खेळाडू म्हणून जरी घेतलेले असले तरी पण पाकिस्तानविरुद्ध त्याला खेळायला मिळालं नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button