World

T20 Live… न्यूझीलंड विरुद्धचा पुढील सामना जिंकणे भारतासाठी आवश्यक..!त्या आधीच आहे एक खुशखबर..!

T20 Live… न्यूझीलंड विरुद्धचा पुढील सामना जिंकणे भारतासाठी आवश्यक..!त्या आधीच आहे एक खुशखबर..!

दुबई सध्या टी-20 वर्ल्डकप सुरू असून नुकतेच ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला असून आता पुढील सामना 30 ऑक्टोबर रोजी असणार आहे. ह्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.तरच ह्या स्पर्धेत भारत टिकेल. हा ‘करो या मरो’चा सामना असेल. त्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळाली आहे.
न्यूझीलंडच्या T20 न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. भारतासाठी ही बातमी खूप चांगली आहे कारण पुढच्या सामन्यात टीम इंडियाला या घातक गोलंदाज धोकेदायक होता. आयसीसीच्या समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने हा टीम मध्ये समाविष्ट होईल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आहे.शारजाह क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 5 विकेट्स राखत पराभव केला. यामुळे न्यूझीलंड देखील त्याच स्थितीत आहे ज्या स्थितीत सध्या भारतीय संघ आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button