पंढरपूर

स्वेरी अभियांत्रिकीचे रांझणीत संस्कार शिबीर सुरु

स्वेरी अभियांत्रिकीचे रांझणीत संस्कार शिबीर सुरु
आठवडाभर चालणार राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर – पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या सयुंक्त विद्यमाने रांझणी (ता. पंढरपुर) मधील महादेव शंभूलिंगाचे हेमांडपंथी मंदिराच्या पवित्र सानिध्यात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष परिश्रम व संस्कारात्मक स्वरुपांच्या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती स्वेरीच्या इंजिनिअरींगचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास यांनी दिली.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त स्वेरीची ही ‘शाश्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास’ या विषयावर रांझणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आठवडाभर चालणार असून या शिबिरात दररोज सकाळी ९ पासून स्वच्छता, श्रमदान, ग्रामसर्वेक्षण, आरोग्याविषयी जनजागृती, नागरिकांना शिक्षण, आरोग्य व आजार यासाठी मार्गदर्शन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा देश वाचवा, प्लास्टिकबंदी जनजागृती, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज व महत्व, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता, व संबंधित मार्गदर्शन असे अनेक विविध विषयांवर प्रबोधनपर व ग्रामस्वच्छता विषयक विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन नुकतेच रांझणीच्या सरपंच सौ. वर्षाराणी ज्ञानेश्वर घोडके यांच्या हस्ते झाले तर यावेळी उपसरपंच हरी दांडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष कल्याण शिंदे, पोलीस पाटील महादेव पाटील, उद्योजक दादासाहेब ढोले, दत्ता सुरवसे, प्रगतशील बागायतदार कैलास भोसले, ग्रामपंचायत सदस्य बिभीषण अनपट, ग्रामस्थ अनिल पाठक, सचिन फरकंडे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार व विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्या सहकार्याने तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास व प्रा. एस.एम मठपती यांच्या नेतृत्वाखाली, प्रा. ए.एम. कस्तुरे, प्रा. के. एस. पुकाळे, प्रा. एस. एम. काळे, प्रा. एन. एम मस्के, प्रा.वाय.बी. पटेल, प्रा. एस.आर पठाण, प्रा.एस.एन.अनपट, प्रा. एस. व्ही. जगझाप, प्रा. एन.एम. सालविठ्ठल, प्रा. आर.पी. शिंदे व अभियांत्रिकीतील रासेयोचे सत्तरहून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमासाठी रांझणी ग्रामस्त देखील सहकार्य करत आहेत.
छायाचित्र- रांझणी (ता. पंढरपुर) मध्ये स्वेरीज् इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उदघाटन करताना रांझणीच्या सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर घोडके सोबत उद्योजक दादासाहेब ढोले, प्रगतशील बागायतदार कैलास भोसले, ग्रामपंचायत सदस्य बिभीषण अनपट, ग्रामस्थ अनिल पाठक, सचिन फरकंडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास व प्रा. एस.एम मठपती, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व इतर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button