Ratnagiri

कुमारी दिक्षा उईके हिला मानसिक छळ करणा-या वरिष्ठ अधिका-यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करा,अन्यथा आंदोलन: बिरसा क्रांती दल

कुमारी दिक्षा उईके हिला मानसिक छळ करणा-या वरिष्ठ अधिका-यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करा,अन्यथा आंदोलन: बिरसा क्रांती दल
रत्नागिरी : कु. दीक्षा उईके आदिवासी तरुणीला न्याय मिळावा व वरिष्ठ अधिकारी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळुन आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरूणीला मानसिक छळ देणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे ,अन्यथा बिरसा क्रांती दल तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंञी के.सी.पाडवी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरून निवेदन करण्यात येते की, गेल्या कोरोना काळात भूमी अभिलेख ऑफिसमध्ये भूमापक पदावर कार्यरत असणारी कु,दिक्षा उईके ही प्रामुख्याने भंडारा येथील रहिवासी असून ती गेल्या 4 वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख ऑफिस मध्ये कार्यरत आहे, गेल्या कोरोना काळात शेतकरी बांधवांच्या आपले कर्तव्य समजून आपले काम चांगल्या प्रामाणिक पणाने करणारी दिक्षा उईके इला मोठया प्रमाणात भूमी अभिलेख ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी राजू घेटे व दोन सहकारी महिला ह्या वारंवार त्रास देण्याचे प्रयत्न करीत होते. मोठया प्रमाणात जातीविषयी बोलून तिचा अपमान करीत होते, वारंवार तू आदिवासी आहे असे स्पष्ट बोलून तिची मानसिकता संपवून टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी यांनी केला, कोरोना काळात सर्वांचे पगार करण्यात आले दीक्षा उईके यांना वयक्तिक त्रास दयायचा म्हणून पगार न काढणे, तिला अँटिकरपशन मध्ये पकडून देण्याचे षडयंत्र रचणे, एक महिला म्हणून तिला 25 हेक्टर जमीन मोजणी करण्याचे आदेश देणे ,25 हेक्टर म्हणजे 72 एकर एका दिवशी कोणत्या ऑफिस मधील किंवा शेतकरी यांना प्रभोलन देऊन खोटी तक्रार करण्यास सांगणे,
यासर्व बाबींना कंटाळून कु. दिक्षा उईके या आदिवासी तरुणीने 5 मार्च 2021 रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार सुध्दा दिली, परंतु झाले काय पोलीस महिला अधिकारी यांच्याकडून समज देऊन प्रकरण थाबिवले, व सर्वांना शांत केले उलट त्रास कमी न होता. जास्तच वाढला तू पोलिस स्टेशन ला गेली माझ्या विरुद्ध वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार केली असे बोलून जास्तच त्रास देने मानसिक छळ करणे भूमी अभिलेख ऑफिस मधीक महिला यांच्याकडून प्रताडीत करणे हा प्रकार वाढला तरी सुद्धा पोलीस प्रशासन यांनी दक्षता घेतली नाही. ह्या सर्व बाबींना कंटाळून एक वेळ आत्महत्येचा प्रयत्न करणारी दिशा उईके मला प्रशासन मदत करेल माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करेल व मला मानसिक छळ करणाऱ्या माझ्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या मला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी राजू घेटे तसेच दोन महिला कर्मचारी यांना तात्काळ निलंबन करावे तसेच गुन्हे दाखल करावे असे निवेदन बिरसा क्रांती दल या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून 27 मार्च 2021 रोजी जिल्हाधिकारी अमरावती कार्यालय येथे निवेदन देण्यात आले, अस वाटत होते की दीक्षा उईके ईला नक्कीच न्याय मिळेल, प्रशासन दाद देईल परंतु असे होतांना दिसत नाही, एक आदिवासी महिला कर्मचारी असून मोठया प्रमाणात त्रास मानसिक छळ जातीवाचक अपशब्द वापरले जातात परंतु प्रशासन फक्त चौकशी चा कागद हा ह्या कार्यलय तर त्या कार्यालय फिरवत असते, तसेच दीक्षा सोबत होत आहे. लेडी सिघम दीपाली चव्हाण या महिलेने सुद्धा प्रशासन तसेच राजकीय नेते यांना वारंवार एक वर्ष पत्रव्यवहार करून ही तिला वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, अस का होते की मेल्यानंतर लोकांना न्याय देण्यास सर्वच स्थरावर आक्रोश व्यक्त करतात
म्हणजे राजकीय नेते, सामाजिक संघटना, पक्ष, पोलीस प्रशासन हे इतके निर्दयी की कोणाची मरणाची वाट पाहतात की जात पाहतात निषेध जात पाहून करायचा, आज आपल्या मंत्रिमंडळ मधील एका कॅबिनेट मंत्री बद्दल निषेध पोस्ट करणाऱ्या एका सरकारी कर्मचारी याला कोणतीही चौकशी न लावता डायरेक्ट निलंबित केल्या जाते,
मग कोणतीही स्त्री ही आपल्यावर होणारा अत्याचार मानसिक छळ षडयंत्र ही जर प्रशासन किव्हा प्रसार माध्यमातून व्यक्त करून सांगते की, माझ्यासोबत अन्याय होत आहे. तर त्या अधिकारी याच्यावर निलंबनाची कार्यवाही का नाही हाच संघटनेचा प्रश्न आहे म्हणजे मंत्री साठी वेगळे नियम व आमच्यासाठी वेगळे असे तर नाही अमरावती जिल्ह्यात एक दीपाली घडली तर दुसरी घडण्याची वाट हे राजकीय नेते, पक्ष, संघटना, प्रशासन पाहत आहे की काय, की दीक्षा उईके आदिवासी आहे म्हणून तोंड उघडायचे नाही, अत्याचार होऊ द्या, दुसरी दीपाली होऊ द्या, अस तर नाहीना, महिला राज असणाऱ्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसेल तर कशाला हे ढोंग बेटी बचाव बेटी पढाव, हा नारा बंद करून द्यायला हवा, जिथे स्त्री सुरक्षित नाही, उद्या या वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाही झाली नाही. तर उद्या कु दीक्षा उईके ने आत्महत्या केली याला जबाबदार कोण हे तरी सांगा म्हणजे आम्ही अस्वथ होऊ की प्रशासन दीक्षा उईके यांना न्याय देण्यास सक्षम नाही तर आम्ही दाद मागणे बंद करू,
एक आदिवासी युवा तरुणीला ज्या वरिष्ठ अधिकारी यांनी आत्महत्या करण्यास मजबूर केले, त्या अधिकारी वर गुन्हे दाखल करून निलंबित करावे. अन्यथा बिरसा क्रांती दल तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा सुद्धा सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाला दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button