Bhandra

सबलक्जेटेड कैटेरेक्ट या आजारापासून ग्रस्त मुकबधिर विद्यार्थ्याची भंडारा येथे केली निशुल्क शस्त्रक्रिया

सबलक्जेटेड कैटेरेक्ट या आजारापासून ग्रस्त मुकबधिर विद्यार्थ्याची भंडारा येथे केली निशुल्क शस्त्रक्रिया

भंडारा राजेश सोनुने

खुशी फाऊंडेशन चा पुढाकार, विद्यार्थ्याला मिळाली नवी संजीवनी* नेत्ररोग पासून पिडीत तथा सबलक्जेटेड कैटेरेक्ट रोगाने ग्रस्त दिव्यांगाची नि:शुल्क नेत्र शस्त्रक्रिया करून भंडारा येथील खुशी फाऊंडेशने आदर्श प्रस्थापित केला. असे करून फाऊंडेशनी दिव्यांगाच्या स्वास्थ्य समस्यांच्या निराकरण करण्यासाठी लोकांनी समोर येण्याचा संदेश दिला. खुशी फाऊंडेशन चे संस्थापक राजेश प्र.राऊत यांच्या पुढाकाराने नेत्ररोग पासून पिडीत तथा सबलक्जेटेड कैटेरेक्ट रोगाने ग्रस्त दिव्यांगाची शस्त्रक्रिया श्री साई मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे नेत्ररोग तज्ञ डॉ. दुर्गेश पशिने व डॉ पुनम पशिने यांनी केली .

व्यवसायाने मजुर परीवारातील दिव्यांग विद्यार्थ्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया विनाशुल्क झाल्यामुळे त्यांचे पालक भावनिक झाले. आपली शस्त्रक्रिया यशस्वी झालेला विद्यार्थ्यी अजय गोपालजी चौधरी मु. किटाळी ता. लाखनी येथील आहे. खुशी फाऊंडेशन व राज्य युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री राजे छञपती मुकबधिर विद्यालय भिलेवाडा येथे नेत्ररोग व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात काही मूकबधिर अपंग विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आजाराने ग्रासलेले आढळून आले. त्यात अजय सुध्दा होता. त्याचा मोतीबिंदू डोळ्यात तुटून कठीण स्थितीत होता. डॉ. दुर्गेश पशिने यांनी सबलक्जेटेड कैटेरेक्ट निदान करून लवकरच शस्त्रक्रिया करण्यात यावी असे कळविले. अजय चे पालक अत्यल्प भूधारक आणि मजुर असल्याने शस्त्रक्रिये वरील खर्च करण्यास असमर्थ होते. डॉ. दुर्गेश पशिने, डॉ. पुनम पशिने (दुधाने) यांनी मानवतेच्या भावनेनं निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल असे कळविले. व खुशी फाऊंडेशन चे संस्थापक राजेश राऊत व अध्यक्ष सौ.स्वाती राऊत यांनी एक हात मदतीचा दिला. अजय च्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया अडीच तास चालली. राजेश राऊत यांनी दिव्यांग मुले शारीरिक व मानसिक आजारापासून ते दुर राहावेत याकरिता अभियान सुरू राहील. सौ.स्वाती राजेश राऊत, सौ. नंदा चेटुले, जागेश्वर बोरकर गोपालजी चौधरी, श्रीकांत पारधी यांनी सहकार्य केले. तर डॉ. दुर्गेश पशिने व डॉ पुनम पशिने (दुधाने) यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल राजेश राऊत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Back to top button