Surgana

सुरगाणा शहरातील घरफोड्या फोडणारा चोरास दिले सुरगाणा युवकांनी पकडून

सुरगाणा शहरातील घरफोड्या फोडणारा चोरास दिले सुरगाणा युवकांनी पकडून

विजय कानडे सुरगाणा

सुरगाणा : सुरगाना शहरात मागील काही महिन्यापासून घरफोडी चोऱ्या त्यातच येथील व्यापारी गणेश जंगम यांच्या घरी घरफोडी करण्यात आले त्यांच्या शेजारील परिसरात सीसीटीव्ही आहे त्या फुटेजमध्ये चोर घराचा कुलूप तोडत होतो ते सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होतो त्यांनी सर्व फुटेज लोकल ग्रुप वरती वायरल केली आणि त्याच्या तर स्पष्ट दिसत होता नेमकी तो दरोड्याच्या उद्देशाने शुक्रवारी सुरगाणा शहरात पुन्हा या उद्देशाने आला आणि संशयित रित्या तो फिरत होता युवकांनी त्याला पाहिले आणि मागील चोरी केली तो चोर हाच आहे त्यांनी लगेच सर्व मित्रांना ती हकीकत कळवली आणि त्याचा पाठलाग करू लागले सर्व मित्र जमल्यानंतर सुरगाणा येथील पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कोळी साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितले त्यांनी लगेच पोलीस हवालदार डंबाळे आणि एक होमगार्ड पाठवला अगोदर सर्व युवकांनी त्याला सुरगाणा येथील भरकादेवी म्हणून असलेला हॉटेलमध्ये पकडून ठेवले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी त्याची झडती घेतल्या त्याच्याकडं हत्यारा निघाले आणि त्याचं नाव दाभाडे अरुण अंकुश( साईनाथ नगर नांदुर नाका नाशिक) असे सांगितले आणि भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने मी येतो आणि जे घराला कुलूप असते ते घर फोडतो त्याच्यावर कलम457/380 गुन्हा नंबर35/2021 गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयात हजर करण्यात आले आणि पोलिस कस्टडी मागण्यात येणार आहे त्यामुळे अजून गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके तसेच तसेच पोलीस हवालदार मधुकर पवार आदि तपास करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button