Mumbai

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे जबरदस्त नृत्य सोशल मीडियावर व्हायरल…

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे जबरदस्त नृत्य सोशल मीडियावर व्हायरल…

मुंबई येथील रेनेसॉ सप्ततारांकित हॉटेल मध्ये संजय राऊत यांच्या कन्येचा विवाह सोमवारी होणार आहे.तत्पूर्वी संगीत च्या कार्यक्रमात खा सुप्रिया सुळे आणि शिवसेना खा संजय राऊत यांचा डान्स मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सतत रोखठोक वक्तव्य आणि विरोधकांच्या टीकेचा सामना करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी चा विवाह सोमवारी २९ नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button