India

OBC आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने अहवाल नाकारला..!राज्य सरकारला झटका..!

OBC आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने अहवाल नाकारला..!राज्य सरकारला झटका..!

OBC आरक्षण संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू करता येणार नाही.
कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे… राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थिगिती देण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.

परंतू राज्याचा अहवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का नसला आहे.
आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत असा पावित्रा सत्ताधारी पक्षातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे.
तर भाजप नेते आशिष शेलार यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारवर टीका केली असून राज्य सरकार या निर्णयासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button