Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला : येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूर्यनमस्कार हा कार्यक्रम यशस्वी साजरा करण्यात आला. यूजीसी सचिव रजनीश जैन यांनी देशातील १००० हून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे. यानुसार फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या सर्व विद्याशाखांनी भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूर्यनमस्कार हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरच्या प्रांगणात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा शारीरिक संचालक प्रा. प्रभाकर सुतार यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व त्याचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. सूर्यनमस्कार ही आसनांची एक मालिका आहे, ज्याद्वारे शरीरातील प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. हाताचे मनगट, कोपर, खांदे, पाठीचा कणा, गुडघे, पायाचे घोटे अशा सर्व सांध्यांना सूर्यनमस्कारामुळे फायदा मिळतो. शरीराची चपळता, स्फूर्ती वाढते. शरीर संवर्धनासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत. दमसास वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत. रुधिराभिसरण सुधारून रक्तातील मलभाग (टॉक्झिन्स) बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत.अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने आपला सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button