Ambad

सुखापुरी तलाव १००% ओव्हरफ्लो १५ गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी

सुखापुरी तलाव १००% ओव्हरफ्लो १५ गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी

संजय कोल्हे जालना

अंबड : तालुक्यातील सुखापुरी बृहत लघु पाटबंधारेचे तलाव यावर्षी सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने १०० टक्के भरल्याने आज तलावातील पाण्याची विधिवत पूजा पंचायत समिती उपसभापती रईस बागवान यांच्याहस्ते करण्यात आले आहे. यावेळी सरपंच सुखापुरीचे भगवान राखूंडे लखमापुरीचे सरपंच संदीप गाढे पोलीस पाटील इलियास बागवान,तलाव निरीक्षक भाऊसाहेब साळुंके,जिजा मोताळे,राजू तारगे,रमेश लहुटे यांची उपस्थिती होती.परिसरातील सुमारे १५ गावांतील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सद्यस्थितीत मार्गी लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. हा तलाव भरल्याने आसपासच्या सुमारे १५ गावांच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परिसरातील सुखापुरी, लखमापुरी,बेलगांव,कुक्कडगांव,कौडगाव,रेवलगांव, वडीकाळ्या,दहेगाव, बनगाव,पांगरखेडा,कुक्कडगांव तांडा सह इतर गावातील शेत जमिनीला या तलावाचा सिंचनासाठी मोठा आधार आहे. या सर्व गावांच्या पिण्याचा प्रश्न आता मिटणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुखापुरी तसेच डावरगांव या तलावात सलग २ वर्षात २ वेळा १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तालुक्यातील सर्व लघु पाटबंधारेच्या तलाव यावर्षी लवकरच भरत असल्याने रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपसा कराचा भरणा केला आहे. आशा शेतकऱ्यांना ऊस,मोसंबी, डाळिंब,कापूस,ज्वारी,गहू,हरभरा इत्यादी पिकांना फायदा मिळणार आहे.
डिगंबर रायबोले

– उपविभागीय अधिकारी
लघु पाटबंधारे,उपविभाग अंबड

Leave a Reply

Back to top button