Nashik

लासलगाव बाजार समितीचे कर्मचारी संजय होळकर यांचा असाही प्रामाणिकपणा—

लासलगाव बाजार समितीचे कर्मचारी संजय होळकर यांचा असाही प्रामाणिकपणा—

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत वाकद येथील शेतकरी साहेबराव पगार यांचे महत्वाची कागदपत्रे, एटीएम, धनादेश व रोख पैसे असलेले पाकीट परत दिले.
वाकद येथील साहेबराव पगार यांचे लासलगाव येथील अक्सिस बँक परिसरात पाकीट पडले. त्यात महत्वपूर्ण ओळखपत्रे, पॅनकार्ड, चालक परवाना, कोरा धनादेश, एटीएम कार्डवर पिन लिहिलेला असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन अक्सिस बँकेने परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज बघितले त्यात पाकीट आढळून आले नाही. मात्र लासलगाव येथील रहिवाशी, आय.सी.आय. सी. आय बँक कर्मचारी असलेल्या काजल विजय होळकर यांना पाकीट लासलगावात बाजार समिती परिसरात वर्दळीच्या ठिकाणी सापडले. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्याचे हे पाकीट असावे असे समजून त्यांनी पाकीट बाजार समिती कर्मचारी संजय होळकर यांच्याकडे दिले. त्यांनी सौ. शोभा शाहू होळकर यांचे मुखेडला असलेल्या माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे असलेले कल्याण आहेर या नातेवाईकांच्या मार्फत पगार यांच्याशी संपर्क साधला व पाकीट परत केले.
होळकर यांचा प्रामाणिकपणामुळे भारावून पागार यांनी लासलगाव बाजार समितीत जाऊन कृ.उ.बा.समिती सचिव एन.एस.वाढवणे यांच्या उपस्थितीत संजय होळकर यांचा सत्कार केला. लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघात ग्रस्त महिलेची तीन तोळ्यांची पोत होळकर यांनी प्रामाणिकपणे दिल्याची माहिती मिळाली. बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचे नेहमीच पावत्या, पैसे हरवतात मात्र या वस्तू जर कर्मचाऱ्यांना सापडल्या तर ते प्रामाणिकपणे परत देतात किंवा कार्यालयात जमा करतात अशी माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. होळकर यांच्या कामाबद्दल लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांनीही अभिनंदन केले आहे.
नागरिकांनी मुळ ओळखपत्रे सोबत न ठेवता सरकारी ओळखपत्रे जपण्यासाठी आता मोबाईल अँप आले असून नागरिकांनी त्यांचा वापर करावा. नागरिकांनी सोबत असलेल्या धनादेशावर अगोदर सही टाळावी ए.टी.एम कार्डवर पिन लिहू नये असे आवाहन
राहुल वाघ स.पो.नी लासलगाव यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button