Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा 2021-22 ह्या यशस्वीरित्या संपन्न झाल्या. योगा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ सतिश चौधरी हे उपस्थितीत होते. उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. उमेश पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.
आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेसाठी पुरुष गटात 36 व महिला गटात 30 खेळाडूनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ प्रतिभा ढाके व पंच म्हणून प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर सर यांनी काम पाहिले. योगा पुरुष प्रकारात प्रथम- म. जे. महाविद्यालय जळगाव, व्दितीय- श्री. जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर, तृतीय- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वरणगाव तर महिला गटात प्रथम क्र.- मु. जे. महाविद्यालयञ जळगाव व्दितीय क्र.श्री. जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व तृतीय क्रमांक. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर राहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. सतिश चौधरी सर यांनी आजच्या अधुनीक युगातील योगाचे महत्त्व व योगाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, जळगाव क्रीडा समिती चे सचिव प्रा. चंद्रकात डोंगरे, सहसचिव प्रा. डॉ. पी. आर चौधरी, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. सुभाष वानखेडे प्रा. उमेश पाटील आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button