Nimbhora

निंभोरा येथील फसवणूक झालेल्या वाहनधारकास परत मिळाले वाहन. निंभोरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.

निंभोरा येथील फसवणूक झालेल्या वाहनधारकास परत मिळाले वाहन. निंभोरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.

संदिप कोळी निंभोरा

निंभोरा : निंभोरा येथील वाहनधारक प्रवीण गुल्हाणे यांचे मालवाहू वाहन अहमदनगर येथील एका इसमाने खरेदी करून बयाना देत नंतरची रक्कम व वाहन घेऊन पोबारा केला होता मात्र त्यानंतर सदर इसम बेपत्ता झाल्याने व गुल्हाणे यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी निंभोरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,ए एस आय रा का पाटील,पोहेकॉ तडवी,ईश्वर चव्हाण यांनी तपासाची चक्रे ०३ दिवसांत वाहनासह एकास ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त असे की,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निंभोरा येथील वाहन भाड्याने काम करणारे प्रवीण गुल्हाणे यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या अशोक ले लँड कंपनीची( एम एच १९ सी वाय ५९८५ )फायनान्स करून घेतलेली गाडी ओएलएक्स वर विक्रीसाठी जाहिरात टाकल्यानंतर अहमदनगर जिल्हयातील तरुणाने संपर्क करत खरेदीसाठी संपर्क केला त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी व्यवहार ठरत ०१ लाख ५१ हजार रुपये देत उर्वरित फायनान्सचे ४७ हफ्ते खरेदी करणारे भरतील असा व्यवहार सावदा येथे ठरवून नोटरी करण्यात आली व बयाना म्हणून ऑनलाईन ५१ हजार रुपये श्री गुल्हाणे यांना मिळाले.उर्वरित ०१ लाख रुपये लवकर पाठवितो म्हणत त्यांनी गाडी ताब्यात घेत नगर गाठले.दरम्यान उर्वरित ०१लाख रुपयांसाठी गुल्हाणे यांनी कापसे यांना संपर्क साधता मागणी सुरू केली तेव्हा योगेह उर्फ अशोक मोहन कापसे यांनी टाळाटाळ सुरू केली व नंतर प्रतिसाद देणे बंद केल्याने गुल्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर गाठले मात्र सदर पत्त्यावर कापसे नसल्याचे समजल्याने व त्यांचा मोबाईल ही बंद यायला लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे प्रवीण गुल्हाणे यांच्या लक्षात आले.त्यानुसार त्यांनी दि.२२ सप्टेंबर ला निंभोरा पोलिसांत या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची भेट घेत कैफियत सांगितली.सपोनि उनवणे यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे वेगाने फिरविली.गोपनीय माहिती मिळवत लोकेशन वरून दि.२५रोजी रात्री ए एस आय राजेंद्र पाटील,पोहेकॉ मोहम्मद तडवी,पोकॉ ईश्वर चव्हाण यांनी घटनाक्रम लक्षात घेत नगर,शिर्डी,श्रीरामपूर गाठत लोकेशनचा पाठलाग करीत आरोपीस पकडले.गाडी व आरोपीस ताब्यात घेत त्यांनी दि.२७ रोजी सकाळी निंभोरा पोलीस ठाण्यात हजर केले. दरम्यान याप्रकरणी निंभोरा पोलिसांत योगेश मोहन कापसे व त्याचा अन्य सहकारी आकाश श्रीकांत सावळे रा.बारा बाभळी ता जि अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात मोहन कापसे याला अटक करण्यात आली असून आकाश सावळे फरार आहे.आरोपी कापसे यास आज रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास १४दिवसाची न्यायालयीन कोठडी देत जळगाव कारागृहात रवाना करण्यात आले.पुढील तपास सपोनि स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय राजेंद्र पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button