Amalner

मा आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मागणीला यश..!ओखपूरी एक्स्प्रेस ला मिळाला अमळनेरात थांबा..!

मा आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मागणीला यश..!ओखपूरी एक्स्प्रेस ला मिळाला अमळनेरात थांबा..!

अमळनेर:- अमळनेर रेल्वे स्थानकावर मा. आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांचा मागणी नुसार 08401/08402 ओखा पुरी एक्सप्रेस गाडी ला अमळनेर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
शहरातील प्रवासी बांधवांची गौरसोय लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाचा प्रवासी सेवा समिती ने दि 4 सप्टेंबर रोजी भेट दिली होती.त्यास अनुसरून माजी आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांनी समिती चे डॉ.राजेंद्र जी फडके,तथा सदस्यांचा समक्ष अमळनेर स्थानकांवरील विविध समस्यांचा पाढा समिती पुढे वाचत लवकरात लवकर त्यांचे निरसन करण्याची मागणी केली होती.त्यात प्लॅट फॉर्म क्र.1व2 मधील अंतरामुळे प्रवासींना होणारी गैरसोय, दैनंदिन प्रवासी पास(चाकरमान्याचे) सुरू करावी(mst पास पुन्हा सुरू करावे) तसेच विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा त्याच प्रमाणे शहरातील नागरिकांना नगरपरिषद ने सकारात्मकता दाखवली आहे त्या नुसार ग्रामीण रुग्णालय जवळून रस्त्यास मान्यता द्यावी अश्या विविध मागण्या दि.04 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती .त्यास अनुसरून नुकतीच रेल्वे विभागाचा वतीने 08401/08402 ओखा पुरी एक्सप्रेस गाडी अमळनेर येथे थांबवा वी असे नुकतेच आदेश पारित झाले असल्याने माजी आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांनी रेल्वे वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रवासी सेवा समितीचे डॉ.राजेंद्र जी फडके तथा सर्व सदस्याचे आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी च्या वतीने आभार मानत उर्वरित मागण्याची देखील दखल घेत निरसन करते ही विनंती केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button