Pandharpur

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी फेसबुक लाईव्ह व्दारे केलेल्या मागणीला यश

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी फेसबुक लाईव्ह व्दारे केलेल्या मागणीला यश

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजनेवर राजकीय षडयंत्रा द्वारे जी स्थगिती आणली होती ती स्थगिती अखेर आज उठवण्यात आली आहे.गोरं गरिबांना त्यांच्या हक्काची घर मिळावीत. ज्या गरिबांनच आयुष्य भांडच्या खोलीत भाडे भरण्यात चाललय त्यांच्यासाठी पंढरपूरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे शासनाला मागणी केली होती त्या मागणी अखेर आज यश आले आहे. आज विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्न घेऊन या प्रधानमंत्री आवास योजनेवरील स्थगिती महाराष्ट्र सरकारने उठवली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी आक्रमक भूमिका घेत आवाज उठवला होता. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी आपल्या सोबत समाजसेवक गणेश अंकुशराव, सागर चव्हाण, विशाल वाघमारे यांना घेऊन फेसबुक लाईव्ह द्वारे शासनाला स्थगिती उठवा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा ही दिला होता. पण स्थगिती महाराष्ट्र सरकारने त्वरित उठवली आहे. त्यामुळे आवास योजनेतील लाभधारकांना आता आपल्या हक्काची घर मिळणार आहे. या लाभधारकांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचे आभार मानले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button