Nashik

राजारामनगर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे विद्यापीठ परीक्षेत यश..

राजारामनगर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे विद्यापीठ परीक्षेत यश..

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी
कर्म.रा.स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजारामनगर येथील वाणिज्य शाखेतील कुमारी मनीषा अंबादास ठोंबरे Ty bcom या विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये घेतलेल्या TY BCom च्या परीक्षेत विद्यापीठ गुणवत्ता क्रमवारीत 5 क्रमांक मिळविला आहे त्याबद्दल तिचा संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीराम शेटे साहेब संस्थेचे सचिव बाळासाहेब उगले यांच्याकडून तिचा सत्कार करण्यात आला.या संस्थेचे अध्यक्ष म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत झळकणे हे कौतुकास्पद आहे.त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.हे यश मिळविण्यासाठी साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जाधव सर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.अविनाश सोनवणे ,प्रा. नंदू गवळी, प्रा.सुजाता पाटील ,प्रा.इन्द्रेकर सर इतर प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
*प्राध्यापकांचे योगदान*
माझ्या यशामागे महाविद्यालया चे प्राचार्य तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.अविनाश सोनवणे,प्रा.नंदू गवळी,प्रा.सुजाता पाटिल.प्रा.लोखंडे मॅडम, प्रा.सुनील जगताप यांचे योगदान आहे,अशी भावना यावेळी मनिषा ने व्यक्त केली.या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक,मनीषा चे वडील अंबादास ठोंबरे व स्टाफ उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button