Chandrapur

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यासह सिंदेवाही, सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा खासदार अशोकभाऊ नेते व माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या प्रयत्नाना भरघोस यश.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यासह सिंदेवाही, सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा खासदार अशोकभाऊ नेते व माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या प्रयत्नाना भरघोस यश.

ज्ञानेश्वर जुमनाके चंद्रपूर

चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जनतेनी घवघवीत यश दिले असून ब्रह्मपुरी विधानसभेतील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन जनतेनी भारतीय जनता पक्षाला विजय केलेले आहे.सध्या प्राप्त माहितीनुसार विधानसभेतील ब्रह्मपुरी तालुक्यातील 48 पैकी 30 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने एकतर्फी दणदणीत विजय मिळालेला आहे.
सावली तालुक्यातील 50 ग्रा.प. पैकी 25 वर तथा सिंदेवाही तालुक्यातील 45 पैकी 20 ग्रा.प. वर भाजपा ने मुसंडी मारली आहे

काँग्रेसच्या हाती असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील एकही उमेदवार काँग्रेस विजयी होऊ शकलेला नाही. त्या ठिकाणी माजी अतुल देशकर यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. जनतेने सुद्धा माजी आमदार अतुल देशकर यांच्यावर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता दिलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button