Nashik

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना आले यश..ग्रामस्थांना लोखंडी पूल

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना आले यश..ग्रामस्थांना लोखंडी पूल

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक=त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत सावरपाडा येथील पाडयावरील तास नदीवर बल्ल्या जागी लोखंडी पूल खरशेत (तालुका त्रंबकेश्वर) येथील आदिवासी महिलांना 30 फूट खोल तास नदीवरील बल्ल्यावरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. या प्रश्ना संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीने ताक्ताळ दखल घेऊन तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, वाघेरा गण प्रमुख राम जाधव,तालुका संघटक तथा आदीवासी समाजाचे युवा नेतृत्व गोटीराम हसन नाईक,आदीवासी समाजाचे नेते तथा तालुका संघटक तुकाराम देशमुख ,शहराध्यक्ष मोहन सोनवणे आदींनी त्र्यंबकेश्वर पासून ५० किलोमीटर अतिदुर्गम भागात ५ किलोमीटर दगड धोंडयातून मार्ग काढीत तास नदीवर जाऊन सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पद्याधिकारी व कार्यकर्ते यांनी जाऊन आदीवासी महिला भागिनी व बांधव याचे दुख जाणून घेतले होते यानंतर ताक्ताळ त्र्यंबकेश्वर तहसीलदार यांच्या कडे लेखी स्वरुपात आदीवासी बांधवांची कैफियत मांडली होती.१५ दिवसात याठिकाणी लोंखडी पूल न बांधल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.याची दखल घेऊन प्रशासनाने आता तास नदीवर लोंखडी पूल बांधण्याच्या कामाला वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेने बल्ल्यांच्या जागी लोखंडी पूल बसवला. ३० फूट लांब आणि ४ फूट रुंद या आकाराचा पूल असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. रस्ता आणि पाणी योजना आराखडे तयार करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button