Aurangabad

रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे निर्देश

रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे निर्देश

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली याची माहिती (रोड मॅप)घेऊन पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत.

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरील निर्देश दिले. याचिकेवर उद्या शुक्रवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे .

खासदार जलील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दीर्घ काळापासून एकूण २०४८ पदे रिक्त आहेत.

त्यापैकी घाटी रुग्णालयात ८६८, घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डात २१९, महापालिकेच्या रुग्णालयात ८३, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ३३०, शासकीय कर्क रुग्णालयात १२२, शासकीय कर्क रुग्णालयाच्या एक्स्टेंशन बिल्डिंगमध्ये ३६४, चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६० पदे रिक्त आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button