Aurangabad

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

ढगफुटी सदृश्य पावसामुळे कन्नड , सोयगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज ( दि.1 ) रोजी पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग चव्हाण,माजी आमदार नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे , केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वरकड आदी अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button