Nashik

थोरात विद्यालयात नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांना शपथ

थोरात विद्यालयात नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांना शपथसुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधीमविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनियर कॉलेज मोहाडी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली
हरित सेना प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा चे दुष्परिणाम विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. नायलॉन मांजामुळे विविध पशु-पक्षी व प्राणी गंभीर जखमी होतात.प्रसंगी प्राणही जातात असे विद्यार्थ्यांना पटवून गेले. पतंग उडवण्यासाठी सुती दोरा यांचा वापर करेल व नायलॉन मांजा न वापरण्याचे तसेच पर्यावरणपूरक संक्रात साजरी करण्याचे आव्हान केले
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख, प्रदीप जाधव,वसंत पगार,माधव पवार, शरद निकम, ज्ञानेश्वर भवर,मंगेश वाळके, दिलीप पागेरे,महेंद्र डांगले, सागर गाडे, किशोर चौधरी,छाया शिरसाट अनिता पवार ललिता पाटील आधी शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते
थोरात विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नायलाॅन माजा न वापरण्याची शपथ देतांना प्राचार्य श्रीराम खुर्दळ ,पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख, प्रदिप जाधव व हरित सेना प्रमुख प्रमोद सोनवणे आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button