Ahamdanagar

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देव मानावे :  जगन्नाथ गावडे

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देव मानावे : जगन्नाथ गावडे

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : विद्यार्थ्यांनी शिक्षकांना व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देव मानावे असे उद् गार माळेगाव ने च्या शिवशक्ती मिल्क प्राँडक्ट अँड आँईल इंडस्ट्रीज चे मालक जगन्नाथ गावडे यांनी काढले ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण महर्षी आबासाहेब काकडे यांच्या ४३व्या पुंण्यस्मरण सोहळ्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरापूर हायस्कूलचे माजी प्राचार्य जयराम सुडके हे होते. प्रथम स्व.निर्मलाताई व आबासाहेब काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर महाविद्यालयाचे प्रिंसीपाँल रोहिदास उदमले,डी एड काँलेजचे प्राचार्य प्रा.अरुण चोथे, बी.सी.एस.काँलेजचे प्राचार्य नितीन मोरे, यांनी स्व.आबासाहेब काकडे यांच्या जिवनावरील “कर्मयोगी आबासाहेब काकडे”या पुस्तकातील आठवणींना उजाळा दिला. ज्ञानेश्वरीतील पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली.राजेंद्र बांगर,शिवाजी लांडे,अन्नदाते सर,देवकर सर, यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button