गडचिरोली

विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रात उतुंग भरारी घ्यावी- खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन।

विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रात उतुंग भरारी घ्यावी- खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन।

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते नप शाळांमधील विजयी चमूचा गौरव
संकुल शाळेने पटकाविले विजयी प्रावीण्य चषक नप शाळांच्या क्रिडा संमेलनाचा समारोप

ज्ञानेश्वर जुमनाके

गडचिरोली:- विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच आपल्यातील उपजत कला व क्रीडा गुण विकसित करून क्रिडा क्षेत्रात प्रगती साधावी व पुढील क्रिडा क्षेत्रातील भविष्यासाठी खेळाडू वृत्तीने खेळ करून जिद्दीने विजयी होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. व विद्यार्थ्यांना भावी उज्वल यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या नप शाळांच्या कला व क्रीडा संमेलनाच्या बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमात विशेष अतिथी व बक्षीस वितरक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही गटात प्राविण्यासह चॅम्पियन शिल्ड पटकाविन्याऱ्या नप संकुल शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रावीण्य चषक व प्रमाणपत्र देऊन खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ★★★★★★★★★★★★★★★
नगर परिषद गडचिरोली च्या वतीने शहरातील नप शाळांच्या शालेय बाल कला व क्रीडा सम्मेलनाचे बक्षीस वितरण आज 30 डिसेंबर 2019 रोजी खासदार अशोक नेते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, मुख्याधिकारी संजीव ओव्हाड, नप सभापती वर्षाताई बट्टे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक रमेशजी भुरसे, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, सभापती प्रशांत खोब्रागडे, नगरसेवक केशव निंबोड, नप चे शिक्षण विभाग प्रमुख बंडूभाऊ ताकसाडे, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, उपस्थित होते. यावेळी विजयी चमू व विद्यार्थ्यांना खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Back to top button