Pandharpur

समाजसेवक संजय(बाबा)ननवरे यांनी वाचविले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष,त्वरित भरली फी.

समाजसेवक संजय(बाबा)ननवरे यांनी वाचविले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष,त्वरित भरली फी.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूरसमाजसेवक संजय ननवरे यांनी वाचविले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष,पंढरपूर येथील समाजसेवक संजय ननवरे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात,पंढरपूर आणि पंचक्रोशीत कोणीही व्यक्ती आर्थिक विवंचनेत किंवा कसल्याही संकटात सापडला असला की त्याला आठवण येते ती संजय बाबा यांचीच कारण कोणतीही शंका,किंतु परंतु याचा विचार न करता नेकीं कर और दारिया मे डाल अशा दारिया दिल वृत्तीने ते कायमच सर्वांची सर्वतोपरी मदत करीत असतात, चप्पल लाईन येथे शॉर्टसर्किट होऊन काही गरीब विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्याचप्रमाणे नवी पेठ येथे जुन्या कपडे विक्रेत्यांचे गोडाऊन जळाले होते यावेळी सुध्दा गोरगरीब महिलांना आर्थिक मदत केली, पत्रकार भैरवनाथ कडाळे, सावकाराच्या त्रासापायी आत्महत्या करावी लागलेल्या संतोष साळुंखे यांच्या कुटुंबियांना मोठे आर्थिक सहाय्य करून धीर दिला.फोटोत समाजसेवक संजय ननवरे यांच्या शेजारी उभा असलेला विद्यार्थी माऊली गोपाळ सूर्यवंशी हा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत आहे व हुशार
आहे .मार्क ही खुप छान आहेत येत्या चार मार्चला परीक्षा आहेत पण परीस्थिती खुपच बिकट असल्याने तो फि भरु शकत नव्हता कॉलेजच्या प्राचार्य साहेबांनी सांगितले की काहीतरी फि भरल्याशिवाय तुला परिक्षेला बसता येणार नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांने व त्याच्या वडिलांनी खुप टेंशन घेतले होते, त्यानंतर रॉबिनहूड आर्मीचे सदस्य श्री दिपक सगर यांचा मला फोन आला व सर्व हकिकत सांगितली मी लगेच त्यांना येण्यास सांगितले व फि ची रक्कम ननवरे यांनी मुलाच्या वडिलांकडे फि दिल्यावर मुलगा आणि वडील दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button