Nashik

?ह्या जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉक डाऊन..!

?ह्या जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉक डाऊन..!
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

नाशिक शहरातील परिस्थिती ही चिंता वाढवणारी असून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने नाशिक शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

१२ मेपासून शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. दहा दिवसांसाठी लॉकडाउन असणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही’ अशी माहिती महापालिका आयुक्त जाधव यांनी दिली आहे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button