Karnatak

कर्नाटकात १० मे ते २४ मे पर्यंत कडक लाँक डाऊन

कर्नाटकात १० मे ते २४ मे पर्यंत कडक लाँक डाऊन
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : कर्नाटकात बीएस एडीयुरप्पा मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला १० मे ते २४ मे पर्यंत कडक लाँक डाऊनची नेमावली लावली आहे कर्नाटकात सर्व सीमा बंद गावातील मुख्य सीमा व गल्या बंद दवाखाना मेडीकल हे २४ सेवा उपलब्ध असेल तसेच फळभाज्या व किराणा दुकान हे सकाळी ६ ते १० पर्यंत चालू असतील शनिवार रविवारी जनता कर्फु असेल.
तहसील कार्यालय व ईतर सरकारी कार्यालय वेळे प्रमाणे बँक हे सुरू असतील खाजगी कार्यालये हे पन्नास टक्के कर्मचारी उपस्थित राहुन सुरू राहतील कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री यांनी सर्व एस.पी.आँफीसरांना फोन करून नियमावली दिली आहे की सर्व शहर व खेड्यात विनाकारण दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन फिरणार्याना त्यांच्या गाड्या जप्त करून पोलीस ठाण्यात १० मे ते २४ मे किव्हा लाँक डाऊन संपेपर्यंत जप्त करून ठेवण्याचे आदेश दिले आहे .
यावेळी हुलसूर परिसरात सर्व मुख्य गल्या व मुख्य चौक लाकडे ब्यारीगेट्स लावून बंद केली गेली आहे व परिसरात विनाकारण दुचाकी व चारचाकी गाड्या सुमारे २३ गाड्या सोमवारी जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे पीएसआय गौतम सर यांनी माहिती दिली की मास्क लावून फळभाज्या व किराणा दुकानात सोशल डिस्टंट ठेवून खरेदी करावी व विनाकारण घराबाहेर पडू नये अशी माहिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button