Jalana

अंबड उपजिल्हा रग्णालयात 100 ऑक्सीजन बेड वाढवा प्रशासनाला आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या कडक सुचना

अंबड उपजिल्हा रग्णालयात 100 ऑक्सीजन बेड वाढवा प्रशासनाला आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या कडक सुचना
संजय कोल्हे जालना
अंबड : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना मा.ना.राजेश टोपे यांनी दिनांक 1 मे 2021 रोजी अंबड उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली करुन आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतदगावकर,वै्कीय अधिकारी डॉ.तलवाडकर,तहसीलदार विद्याचरण कडवकर,तालुका आराग्य अधिकारी डॉ.खदगावकर,वैद्यकीय आधिकारी डॉ.विलास रोडे आदी उपस्थित होते.
जालना जिल्हयाचे पालकमंत्री ना.राजेश टोपे यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 100 ऑक्सीजन बेड वाढविण्याच्या कडक सुचना दिल्या यावेळी रुग्णालयातील रिक्त जागेबाबत आढावा घेतांना त्वरीत एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांची भरती करा तसेच दतर लागणारे मनुष्यबळ नर्स,वार्डबॉय,स्वच्छता कर्मचारी,औषध निर्माता आदि रिक्त् जागा दोन दिवसात भरण्याच्या सुचना दिल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसचे सामान्य माणसाला जालना किंवा इतर ठिकाणी जाण्याची वेळ येऊ देवू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली.ऑक्सीजन कमी पडू नये म्हणून 20 के.एल.च्या दोन लिकवीड टँक टाक्या बसविण्याच्या सुचना दुरध्वनीवरुन जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.औषधी व ऑक्सीजन कमी पडता कामा नये जर हे लक्षात आले तर संबधीतांवर कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दम देण्यात आला.रुग्णालयातील स्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली स्वच्छतेसाठी जास्तीचे कर्मचारी नियुक्त् करण्याच्या सुचना दिल्या.
फिजिशीयन डॉक्टर नियुक्त करा जेणेकरुन गंभीर रुग्णांच्या निदानासाठी त्यांचा फायदा होईल अशा महत्वाच्या सुना त्यांनी प्रशासनाला केल्या तसेच त्यांनी 1 अँबुल्न्स माझ्या आमदार फंडातून देण्यात येईल असे सांगितले.गरज पडल्यास पुन्हा नव्याने आयटीआय अंबड येथील तंत्रशाळेत कोवीड सेंटर सुरु करण्यात येईल त्या जागेची सुध्दा पाहणी केली.सुरु असलेल्या कोवीड सेंटरमध्ये मुलभूत सुविधा द्या.प्रत्येक ठिकाणी पिण्याचे पाणी,जेवण व इतर सुविधा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पुरवाव्यात अशा सुचना दिल्या.
यावेळी नगरसेवक तथा गटनेता न.प.अंबड शिवप्रसाद चांगले,काकासाहेब कटारे,प्रकाश नारायणकर, संजय कोल्हे, शहराध्यक्ष अर्जुन भोजने,श्री.वराडे,ॲड कृष्णा शर्मा,मोईन शेख,कैलास भोरे,सचिन खराद,बाबु चित्राल,डॉ.योगेश ढेंबरे आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button