Pandharpur

भाजपाचे सौ.चित्राताई वाघ यांची बदनामी करणा-यांवर कडक कारवाई व्हावी:विदुल अधटराव

भाजपाचे सौ.चित्राताई वाघ यांची बदनामी करणा-यांवर कडक कारवाई व्हावी:विदुल अधटराव


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष मा. सौ चित्राताई वाघ यांच्या विरोधामध्ये सोशल मीडिया वरती बदनामीकारक पोस्ट तयार करून त्यांची बदनामी केली आहे. त्याबाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तीव्र स्वरूपाचा संताप सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे याबाबतीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्याकडून आज पंढरपूरचे भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्ष विदुल अधटराव यांनी पंढरपूर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम त्याचप्रमाणे पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.अरुण पवार साहेब, पंढरपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, यांच्याकडे निवेदन सादर केले असून यामध्ये सौ.चित्राताई वाघ यांचे फोटोत बदल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोशींना लवकरात लवकर सापडावेत असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष-विदुल अधटराव ओबीसी सेलचे अध्यक्ष लखन ननवरे, युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत धुमाळ सतीश सासवडकर,ऋतुराज रोपळकर,कृष्णा पवार, प्रथमेश कदम,पांडुरंग करकमकर,इत्यादी युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button