Nashik

स्त्री सन्मान गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

स्त्री सन्मान गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=जागतिक महिला दिनानिमित्त भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री सन्मान गौरव पुरस्कार सोहळा

दि. ८ मार्च २०२२ रोजी दुपारी. 3 वा. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतिने राणेनगर परीसरात भागवत सभागृह चेतणानगर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक महापालिका शिक्षण सभापती मा.सौ.संगिता गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे मा.संगिता अमोल जाधव मा.अॅड.सोनल कदम मॅडम.माजी.नगरसेविका शितलताई भामरे मा.सोनलताई कुलकर्णी सामाजिक नेत्या.सौ.मिनाताई बिडगर मा.रेखाताई निकुंभ या प्रमुख पाहुणे म्हणून महिला दिनानिमित्त उपस्थित होत्या यावेळी विशेष उपस्थिती मध्ये समितीचे राष्ट्रीय सचिव मा.हर्षद गायधनी मा.योगेश मालुंजकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष.मा.जुबेर शेख राष्ट्रीय संर्पक प्रमुख मा.संजीव आहिरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.रविंद्र उगले राष्ट्रीय संघटक मा.भुषण देशमुख राज्य कार्याध्यक्ष मा.भाऊसाहेब देसले मा.राजेंद्र भालेराव या मान्यवरांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा व मार्गदर्शन केले त्यांच प्रमाणे महिलांना ग्राहक संरक्षण कायदा माहिती होण्यासाठी मा.अॅड.सोनलताई कदम यांनी ग्राहकांचे अधिकार व ग्राहक जनजागृती वर मार्गदर्शन दिले तसेच.मा.बांगर साहेब वजनमापे अधिकारी यांनी वजनमापेवर सखोल माहिती दिली यानंतर प्रमुख मान्यवर व समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे यांच्या हस्ते स्त्री सन्मान गौरव पुरस्कार प्रधान करून 13 सामाजिक क्षेत्रातील महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी समितीचे कार्य गावागावात पोहोचले जावे या करिता पदग्रहण करण्यात आले मा.सौ.सोनाली जाधव कळवण यांची नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षा महिला विभाग या पद निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले त्यांच प्रमाणे अभोणा येथील सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या मा.सौ.सोनीताई ठाकरे यांची नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पद निवड करण्यात आली यावेळी बरेच पदाधिकाऱ्यांना पद देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहर अध्यक्षा मा.अनिताताई जाधव तर नाशिक शहर सचिव ज्योती वाईकर व मा.विद्याताई निकम नाशिक शहर उपाध्यक्ष आदिंनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button