Bollywood

Bollywood: नागराज मंजुळे चा हटके लूक..!ओळखू शकणार नाही..!वेगळी भूमिका.. हटके विषय..!

नागराज मंजुळे चा हटके लूक..!ओळखू शकणार नाही..!वेगळी भूमिका.. हटके विषय..!

मुंबई जगभरात कोरोना, ओमायक्रॉनने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. ह्याच विषयावर एक नवी कलाकृतीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर या कलाककृतीच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा आहे. ही कलाकृती आहे नागराज मंजुळे ची अनपॉझ्ड – नया सफर
शिखा मकान, रूचिर अरूण, नुपूर अस्थाना, अयप्पा केएम आणि नागराज मंजुळे हे कलाकार यामध्ये आहेत. २१ जानेवारीला अनपॉझ्ड रिलिज होणार आहे.
२०२० मध्ये आलेल्या अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर या अमेझॉन ओरिजनल अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे.
या फिल्म्समधून महामारीमुळे आपल्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने, आपल्याशा वाटणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर नव्या वर्षाचे स्वागत करत असताना कशाप्रकारे सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करायला हवा हे सांगण्यात आले आहे.
मेझॉन ओरिजनलच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनव स्वरुपाच्या पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश असेल.

कथामालिकेतील शॉर्ट फिल्म्समध्ये समावेश

‘वैकुंठ’ – नागराज मंजुळे दिग्दर्शित; अर्जुन करचे आणि हनुमंत भंडारी यांच्या भूमिका.
‘तीन तिघाडा’ – दिग्दर्शन- रुचिर अरुण; साकीब सलीम, आशीष वर्मा आणि सॅम मोहन यांच्या भूमिका. .
‘द कपल’- दिग्दर्शन- नुपूर अस्थाना; श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पेनयुली यांच्या भूमिका.
‘गोंद के लड्डू’ – शिखा माकन दिग्दर्शित; दर्शना राजेंद्र आणि लक्षवीर सिंग सरन यांच्या भूमिका.
‘वॉर रूम’ – अयप्पा केएम दिग्दर्शित; गीतांजली कुलकर्णी, रसिका आगाशे, पुरनंदन वांधेकर आणि शर्वरी देशपांडे यांच्या भूमिका.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button