Maharashtra

रायगडावर तुफान पावसाच्या सरी..!व्हिडीओ व्हायरल..!रयतेच्या राजाला निसर्गाचा मानाचा मुजरा..!पहा व्हिडीओ…

रायगडावर तुफान पावसाच्या सरी..!व्हिडीओ व्हायरल..!रयतेच्या राजाला निसर्गाचा मानाचा मुजरा..!

छत्रपती शिवाजी महाराज हे असे नाव की ज्यांच्या उच्चारण्यानेही अंगावर काटा उभा राहतो.ऊर अभिमानानं भरून येतो. रक्त सळसळत..बाहू स्फुरण पावतात..डोळ्यासमोर दैदिप्यमान इतिहास उभा राहतो… दैदिप्यमान कामगिरी करत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे आपले सर्वांचे आदर्श असणाऱ्या शिवाजी महाराज हे नावच सर्व सांगून जात..

शिवाजी महाराज ह्या नावाला कोणत्याही आठवणीची गरज नाही कारण त्यांना कधी आपण विसरू शकत नाही पण अवकाळी पावसानं मात्र पुन्हा शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा दाखल केला आहे. एकीकडे अवकाळी पावसाने सर्वत्र धांदल उडाली आहे शेतकरी आणि इतर क्षेत्रात ह्या पावसामुळे अतोनात नुकसान होत आहे. पण सोशल मीडियावर मात्र एका व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील आहे.ह्या व्हिडिओच चित्रीकरण, गाणं आणि एकंदरीत सर्व वातावरण यामुळे हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.अनेकांनी व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा स्टोरीमध्येही हा व्हिडीओ ठेवला होता. पाहता पाहता, ट्विटर, फेसबुकवरही या व्हिडीओनं सर्वांच्याच अंगावर काटा आणला.आणि सर्वांनीची महाराजांना प्रणाम करत त्रिवार मुजरा केला…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button